भंडारा : राजमाता जिजाऊ फौंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊंची ४२७ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी राजमाता जिजाऊंच्या महान कार्याची आणि स्वराज्य स्थापनेतील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी राजमाता जिजाऊंच्या महान कार्याची आणि स्वराज्य स्थापनेतील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
माँसाहेबांच्या जीवन परिचयावर प्रकाश टाकून त्यांचे समता समानता व बंधुत्व तसेच विज्ञाननिष्ठ कार्य याबाबत विस्तृत रूपाने उपस्थित प्रमुख पाहुण्यांकडून प्रकाश टाकला गेला तसेच त्यांनी जनतेचे सुराज्य आणि स्वराज्य स्थापन केले होते व सामूहिक शेती ची संकल्पना त्यांनी मांडली होती. माँसहेब जिजाऊ यांनी समाजातील वाईट चालीरीती, सती प्रथा याविरुद्ध आवाज उठवला. शेतकऱ्यांना सावकाराच्या तावडीतून मुक्त करून सहकार धोरण राबविले. यानंतर राजमाता जिजाऊ फाउंडेशन यांनी केंद्र सरकारच्या धरतीवर “बेटी बचाओ बेटी पढाओ” अभियान सुरू केलेले आहे. याबाबत संस्थेचे संचालक सूर्यकांत ईलमे यांनी बेटी बचाव अभियानाचे महत्त्व विशद केले तसेच पुढील कार्यक्रमाविषयी अधिकची माहिती दिली व उपस्थित सर्व बंधू भगिनींना अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील गरजू लोकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुनील कुरंजेकर उपस्थित होते. त्यांनी जिजाऊंच्या कार्याला सलाम करत महिलांचा आयोजित सन्मान सोहळ्याला मार्गदर्शन केले. त्यानंतर सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. नामवंत वक्त्यांनी जिजाऊंच्या जीवनपटावर आणि त्यांच्या संस्कारातून घडलेल्या छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर प्रकाश टाकला. फौंडेशनने जिजाऊंच्या विचारांचा प्रसार आणि युवा पिढीला त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आदर्श घेण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला, आणि उपस्थितांनी जिजाऊंच्या स्वराज्य निर्मितीतील महान कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याची शपथ घेतली.
आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी राजमाता जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष सौ सुनीता परदेशी , विजय शहारे, योगेश कुंभारे, अशोक सेलोकर, दीपक वाघमारे, राहुल नागदिवे, वैष्णवी परदेशी, अजय वासनिक, राहुल गुप्ता, अमन तांडेकर, रुद्रिका परदेशी, मनीष वाघाये , नितीन नागदेवे उपस्थित होते.
राजमाता माँसहेब जिजाऊ यांची जयंती राजमाता जिजाऊ फाउंडेशन भंडारा तर्फे उत्साहात साजरी

Leave a Comment
Leave a Comment