भंडारा: आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यशैली आणि विकासाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा भंडारा शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील 100 हून अधिक तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मागील काही दिवसात जवळपास 2000 युवक शिंदे गटात सहभागी झाले, हे विशेष.
शिवसेना शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ विविध संघटना जाहीरपणे येत असताना भंडारा शहरातील नव मतदार असलेल्या तरुणांनी ही शिंदे गटात प्रवेश करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हजारो युवकांनी शिंदे गटात काम करण्याची इच्छा व्यक्त करीत प्रवेश घेतला. नुकत्याच 100 तरुणांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश घेतला. यावेळी भोंडेकर यांनी सर्व तरुणांचे दुपट्टा घालून स्वागत केले.
आमदारांच्या माध्यमातून होत असलेला विकास आणि त्यातून दिसत असलेल्या रोजगाराच्या संधी, तसेच तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्याकडून होत असलेले प्रयत्न या आमदार भोंडेकर यांच्या कामामुळे प्रभावित होऊन तरुण शिंदे गटात दाखल होत आहेत. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढत असून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचे बोलल्या जाते. आतापर्यंत शहरातील 2000 हून अधिक तरुणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे विशेष.
…..
एका महिन्यात 2000 पेक्षा अधिक युवकांचे प्रवेश

Leave a Comment
Leave a Comment