लेकींच्या आई बाबांचा सन्मान सोहळा ठरला डोळ्यांचे पारणे फेडणारे
तुमसर:–वंशाचा दिवा म्हणून मुलास समाजात मोठे स्थान प्राप्त असले तरी आजच्या युगात मुलगी कुठेही मागे नाही हे ज्याला मुलगी आहे त्या माता- पित्याने दाखवून दिले आहे.आज मुलीलाही मुलापेक्षाही जास्त महत्व प्राप्त झाल्याने मुलीच्या आई बाबांना सन्मान मिळावा हाच उद्येश घेऊन डॉटर सेव फॉउंडेशन तुमसर वतीने जागतिक दिनाचे औचित्य साधुन दी. 22 सप्टेंबर ला राजाराम लॉन येथे आयोजित लेक लाडकी आई- बाबाची कार्यक्रमा अंतर्गत एक किंवा दोन लेक (मुलगी )असलेल्या माता पित्यांचा सन्मान सोहळा हे डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.
मुलगी ही वडिलांची लाडकी असते, हे सर्वश्रुत मत आहे. मुलीची प्रत्येक इच्छा वडील पूर्ण करतात. मुलीचे एक अनोखे भावनिक नाते वडिलांसोबत असते. आई तर तिची मैत्रीण असतेच, यात तीळमात्र शंका नाही. शासन स्तरावरही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ तसेच माझी मुलगी माझा अभिमान, यासारखे अनेक कार्यक्रम राबविले जातात. मुलगा व मुलगी हे जरी सारखेच असले तरी समाजात मात्र आजही मुलांना प्राधान्य देण्यात येते. मुलगी ही दोन्ही घरचा अभिमान नक्कीच आहे . तिला समाजात मानाचे स्थान मिळावे ह्या उद्येशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकुण 146 लेकी च्या कुटुंबीयांनी सहभाग नोंदविला. लेकीच्या आई बाबा ना प्रोत्साहित करण्यासाठी नागपूर येथील प्रसिद्ध समाजसेविका , यशोदा खरे सेवा सदन विद्यालयाच्या प्राचार्या रेखा दंडिगे, व फर्स्ट फिमेल आयरन मॅन डॉ. सुनिता धोटे, तसेच मिसेस युनिव्हर्स 2020 चाईना, डॉ. रिचा झरारिया, तुमसर चे तत्कालिन मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, रंजिता राजू कारेमोरे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान लेकी व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोरंज ना करिता विजया चोपकर कृत जीवनाची व्यथा पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले त्याच बरोबरच ऑर्केस्ट्रा चे ही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान लेकीच्या आई बाबांना स्मृती चिन्ह व पुष्प उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले.कार्यक्रमांचे प्रास्ताविक संयोजक अनिल गभणे यांनी केले. तर कार्यकर्माचे संचालन संयोजक अनिल कारेमोरे यांनी केलें तर उपस्थितांचे आभार संयोजक अनिल निखाडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोशन रामटेके, योगेश रंगवानी, विजया चोपकर, बाळा पडोळे, मनीष कुकडे , सचिन मानापुरे, राजेश पडोळे, संजय बाभरे, दिपक धूर्वे, चंद्रशेखर पडोळे , कृष्णा डोळस, नितीन बिसने, आदीं नी प्रयत्न केले.