प्रभाग क्रमांक १३ से अजहर शेख़ की संभावित उमेदवारी पर चर्चा तेज़ — जनसंपर्क व विकासाभिमुख कार्यशैली के कारण नाम प्रमुखता से उभरता हुआ
प्रभाग क्रमांक १३ में नगर परिषद निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली असून, नागरिकांमध्ये अजहर शेख़ यांचे नाव एक गंभीर व विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत आहे. स्थानिक समस्यांवर वेळेवर लक्ष देणे, गरज पडल्यास प्रशासनाशी थेट समन्वय साधणे आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी सातत्याने उभे राहणे — यामुळे त्यांना प्रभागात मजबूत जनसमर्थन मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाइट, नागरिकांना लाभ मिळणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष अंमल यामध्ये त्यांनी सक्रियपणे पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच अनेक तातडीच्या कामांवर तोडगा निघाला असून, नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना वाढताना दिसत आहे.
⸻
अजहर शेख़ : कार्यशैली आणि विशेषता
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी स्वतः उपस्थित राहून ऐकणे
फक्त तक्रार नव्हे तर समाधान देणारी भूमिका
शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे
युवक वर्ग तथा सामाजिक संघटनांमध्ये मजबूत समन्वय
सतत उपलब्ध राहणारे, जनतेत मिसळणारे लोकनेतृत्व
या कामकाजामुळे प्रभाग क्रमांक १३ मध्ये अजहर शेख़ हे विश्वासार्ह आणि जनतेच्या मनात स्थान मिळवणारे चेहरा म्हणून पुढे येत आहेत.
⸻
नागरिकांची प्रतिक्रिया :
“आज प्रभागाला अशा प्रतिनिधीची गरज आहे जो फक्त निवडणुकीतच दिसत नाही तर वर्षभर संपर्कात राहतो. समस्यांवर जमीनी पातळीवर लढणारा आणि प्रत्यक्ष मदत करणारा चेहरा म्हणजे अजहर शेख़. हाच खराखुरा लोकाभिमुख नेता आहे.”


