शमशेर ख़ान की ख़ास ख़बर
प्रभाग क्रमांक 16 मधून महिला उमेदवारीत सुशिला भगवान निनावे चर्चेत
सेवाभावी स्वभाव, नम्र कार्यशैली आणि जनसंपर्कामुळे वाढला विश्वास
भंडारा प्रतिनिधी | B.S. Crime India News
भंडारा नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच विविध प्रभागांमध्ये राजकीय चर्चांना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये महिला उमेदवारीसाठी श्रीमती सुशिला भगवान निनावे यांचे नाव विशेष चर्चेत असून, स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा सुरु आहे.
संत कबीर वार्ड, चांदणी चौक येथील रहिवासी असलेल्या सुशिला निनावे यांचे सामाजिक पाश्र्वभूमी आणि लोकांशी असलेला दैनंदिन संपर्क यामुळे त्यांना नैसर्गिक पाठबळ लाभत आहे. त्यांचा मुलगा गोवर्धन निनावे, जो युवा शक्ती संघटनेचा अध्यक्ष असून, अनेक वर्षांपासून सामाजिक कामात पुढाकार घेतो. त्याच प्रेरणेने व समाजकार्यास अधिक व्यापक पातळीवर करता यावे, या उद्देशाने सुशिला निनावे यांनी निवडणुकीत उतरायचे ठरविले आहे.
⸻
संघर्षातून उभी राहिलेली महिला नेतृत्वाची उमेदवार
2011 मध्ये पती भगवान निनावे यांच्या निधनानंतर घराचा भार सांभाळण्यासाठी धुणी-भांडीचे काम करून कुटुंब उभे करताना त्यांनी जनजीवनातील खऱ्या समस्या जवळून अनुभवल्या.
या अनुभवामुळेच त्यांना साध्या नागरिकांच्या व्यथा समजून घेण्याची दृष्टि निर्माण झाली आहे.
⸻
प्रभागाशी घट्ट नाळ
• जन्म आणि लग्न दोन्ही प्रभागातच झाल्याने ओळख मजबूत
• सर्व समाजघटकांमध्ये जवळीक
• महिलांमध्ये विशेष लोकाभिमुख प्रतिमा
• नागरिकांच्या समस्या समजून घेण्याची क्षमता
⸻
सेवाभाव व जनसंपर्क — लोकप्रियतेचे मुख्य कारण
रुग्णालय, स्वच्छता, स्थानिक अडचणी किंवा शासकीय दारात फिरणारे प्रश्न — या प्रत्येक ठिकाणी त्यांनी लोकांना साथ दिली आहे.
यामुळे विविध स्तरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल स्नेह आणि विश्वास वाढत चालला आहे.
⸻
संभाव्य उमेदवारीला मिळत आहे पाठिंबा
प्रभाग क्रमांक 16 मध्ये महिला आरक्षण लागू असताना, प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या आणि संघर्षातून पुढे आलेल्या सुशिला निनावे यांचे नाव नागरिक व स्थानिक कार्यकर्त्यांतून पुढे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे.