शमशेर ख़ान की एक्सक्लुसिव रिपोर्ट
B.S. Crime India News | आवाज़ भंडारा
भंडारा — प्रभाग क्रमांक 9
भंडारा शहरात नगरपरिषद निवडणुकीची चर्चा रंग घेत असताना प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाच्या संभाव्य उमेदवारीसाठी इंजि. सचिन कुंभलकर यांचे नाव अग्रस्थानी दिसत आहे. विकासाभिमुख दृष्टिकोन, संघटन कौशल्य आणि दीर्घकाळ समाजकार्यातील सातत्यामुळे त्यांच्या नावाकडे मतदारांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.
संघटनात्मक अनुभव
• सध्या भाजपा भंडारा शहराध्यक्ष
• पूर्व अध्यक्ष – लॉन्स क्लब भंडारा
• रेल्वे स्टेशन कमिटी सदस्य
• शहरातील विविध जनआधारित उपक्रमांमध्ये सतत नेतृत्व
विकासाभिमुख कार्य व प्रकल्पांत सहभाग
प्रभाग व शहराकरिता खालील विषयांवर त्यांनी सतत पाठपुरावा केल्याचे निदर्शनास येते :
• भंडारा रेल्वे स्टेशन सुविधा सुधारणा व सौंदर्यीकरण प्रयत्न
• नागरिक सुविधांसाठी संपर्क व पाठपुरावा
• शहर विकासासाठी निधी आणण्याबाबत सातत्यपूर्ण प्रयत्न
• रस्ते, ड्रेनेज व सुव्यवस्थित वॉर्ड नियोजनाबाबत अभ्यास
• युवकांसाठी क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये प्रोत्साहन
लोकाभिमुख प्रतिमा
इंजि. सचिन कुंभलकर यांचा थेट नागरिकांशी संवाद, नियमित उपस्थिती आणि समस्यांचे निराकरण करण्याचा सक्रिय दृष्टीकोन यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये सकारात्मकता वाढलेली दिसते. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील मतदारांशी त्यांचा सुलभ संवाद राहिलेला आहे.
म्हणूनच प्रभाग क्रमांक 9 मध्ये इंजी. सचिन कुंभलकर यांची भाजपाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या नावामुळे पक्षाला मजबूत पायाभरणी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.