भंडारा : शिस्तीने देश विकसित होऊ शकतो, हे एनसीसीमुळे शिकायला मिळाले. वडिलांचा शौर्याचा वारसा मला बालपणापासूनच मिळाला. शाळेच्या एनसीसी कडेट्सचे अभिनंदन असून 26 जानेवारीच्या परेडमध्ये बेस्ट कॅडेटचा गोल्ड मेडल मिळवला याचा आनंद आहे. आपण ज्या गोष्टी टाळू शकत नाही, त्या आनंदाने करा,’ असा सल्ला भारतीय वायुसेनेच्या माजी फ्लाइट लेफ्टनंट डॉ. शिवाली देशपांडे यांनी विदयार्थिनींना दिला. स्थानिक नूतन कन्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा ‘या कार्यक्रमात मुलाखती दरम्यान देशपांडे यांनी प्रतिपादन केले.
नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात साजरे झाले. यावेळी “सन्मान सावित्रीच्या लेकींचा” या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात एनसीसी सार्जंट मिताली रावते आणि लान्स नायक हृदयी बंसोड यांनी डॉ. शिवाली देशपांडे यांची मुलाखत घेतली तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विदयार्थिनी पल्लवी बाभरे आणि चेरी गोस्वामी यांनी समुपदेशक डॉ. स्नेहा दामले यांची मुलाखत घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. एम. एल. भुरे होते. मंचावर डॉ. शिवाली देशपांडे, डॉ. स्नेहा दामले, शाळेची माजी विदयार्थिनी तसेच गूगल डेवलपर- ३ पदावर असलेली पूनम आगाशे, प्राचार्य निलू तिडके, प्रभारी शिक्षिका जयश्री केळवदे, शाळा नायिका तानिया मंगतानी, उपनायिका आस्था कुंभलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
समुपदेशक डॉ. स्नेहा दामले म्हणाल्या की शाळांमध्ये समुपदेशन महत्त्वाचे आहे. आपली शिक्षण पद्धती उत्कृष्ट आहे, पण शिस्तीच्या बाबतीत मागे आहोत. समुपदेशन हा पाश्चात्त्य देशांचा कल नसून संत वाड्ःमयातून वर्तणुकीचे शास्त्र शिकायला मिळते. गुगल डेवलपर आणि माजी विद्यार्थिनी पूनम आगाशे यांनी शाळा ही सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे व्यासपीठ आहे असे विशद केले तर अध्यक्ष एम. एल. भुरे यांनी विदयार्थिनींना स्वयंशिस्तीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विदयार्थिनींचा सत्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांत विविध राज्यांच्या नृत्यप्रकारांचे सादरीकरण झाले. संस्थेचे सचिव शेखर बोरसे आणि कार्यकारिणी सदस्य रेखा प्रमोद पनके यांनी आयोजनाचे कौतुक केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वी झाला. पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक प्राचार्य निलू तिडके यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहिणी मोहरील यांनी, तर आभार प्रिया ब्राह्मणकर यांनी मानले.
नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन थाटात साजरे

Leave a Comment
Leave a Comment