ताजा खबर
अयोध्या वरून परतले मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील ज्येष्ठभाविक….. आमदार कारेमोरे यांनी केले भव्य स्वागत…..
तुमसर :- तीर्थयात्रे योजनेअंतर्गत अयोध्याला गेलेल्या नागरिकांचे भंडारा येथील वरठी रेल्वे स्टेशन वर आगमन झाल्या नंतर तुमसर/मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी आलेल्या सर्व प्रवाशांच्या गळ्यात दुपट्टा टाकत स्वागत केले व आमदार राजू कारेमोरे यांच्यामार्फत सर्व प्रवाशांना भेटवस्तू देण्यात आली.आमदार राजू कारेमोरे आणि डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी भव्य स्वागत केले.सर्व भाविक अतिशय आनंदी होते.संपूर्ण या प्रवासात सर्व सोयी सुविधा दिल्या.कसलही त्रास झाला नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.सर्व भाविकांना रात्री आपल्या स्वगावी सोडण्याकरीता 14 बसेस ची व्यवस्था करण्यात आली होती.