२८ सप्टेंबर ला बस सोबतच लोकप्रतिनिधींवर “अंडा फेको” आंदोलन
जिल्ह्यातील एस. टी. बस च्या समस्येसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या नेतृत्वाखाली शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी,भंडारा, विभागीय नियंत्रक एसटी महामंडळ ,भंडारा तसेच पोलीस अधीक्षक भंडारा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विभागीय नियंत्रक श्रीमती तनुजा अहिरकर यांनी बसेची संख्या कमी असल्याने आम्ही सहा महिन्याशिवाय आपल्या समस्या सोडवू शकत नाही असे सांगितले. यावर येत्या तीन दिवसात समस्या सुटल्या नाही तर येणाऱ्या 28 सप्टेंबरला शहीद भगतसिंग यांच्या जयंतीदिनी बस व लोकप्रतिनिधींवर सडले अंडा फेको आंदोलन करण्याच्या इशारा राज्य सचिव कॉम्रेड वैभव यांनी दिला.
भंडारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी हे ग्रामीण भागातुन येतात. तसेच हे सर्व विद्यार्थी गरीब घरातील असून ते खूप अडचणीतून शिक्षण घेत आहेत. आणि ते सर्व विद्यार्थी शिक्षण घेत असतांना एस. टी. बस ची मदत घेतात. मात्र असं असतांना सुध्दा त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी मुख्यतः एस. टी. महामंडळ विभाग कारणीभूत आहे. हजारो विद्यार्थी एस. टी. महामंडळाच्या निकृष्ट दर्जाच्या सेवेमुळे त्रस्त आहेत. बस वेळेवर येत नाही, त्यामुळे विद्यार्थी सकाळी-रात्री उशिरा पोहोचत असतात. त्यांचे पालक यामुळे खूप चिंतेत असतात. बस वेळेवर आली तर गर्दी आहे म्हणून थांबत नाही, कर्मचाऱ्यांची वागणूक बरोबर नाही,ते विध्यार्थ्यांशी उद्धट व रागावून बोलतात, हे योग्य नाही. यामुळे मुलांना मानसिक, शारीरिक त्रास तर होतोच सोबतच त्याचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांच्या विविध समस्या समजून घेऊन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन(AISF)ने काही मागण्या पूर्ण करण्याची विनंती करीत केली. यात एस. टी. महामंडळच्या सर्व आगारातून सुटणाऱ्या बसेस ह्या वेळेवर येत नाही, त्याचे व्यवस्थित नियोजन करून वेळापत्रकानुसार बसेस चालवावे. बस ही वेळेवरच आली पाहिजे,
काही लोकल बसेसला थांबा असतांना सुद्धा भंडारा,मोहाडी,तुमसर,लाखनी, साकोली, लाखनी,लाखांदूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI), अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी, वरठी ,MIET शहापूर जवळ बस थांबत नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या सोडून बाकी नागपूर-गोंदिया पर्यंत जाणाऱ्या सर्व बसेस (सुपर बस ) ला थांबा देण्यात यावे.
एस. टी. महामंडळ सर्वसामान्य,गरीब विध्यार्थ्यांच्या सेवेत असलेल्या “मानव विकास व अहिल्याबाई होळकर ” या कार्यक्रमांच्या निळ्या रंगाच्या बसेस त्यांचा सेवेत न चालवता खाजगी सनफ्लॅग,फादर ऍंगल,माणिक नगर इ. शाळांच्या सेवेत रुजू करून शासनाच्या महत्वाच्या कार्यक्रमाचा दुरुपयोग करीत आहे, हे कितपत योग्य आहे? हे त्वरित बंद करा. आणि जे बसेस ज्यांच्या सेवेसाठी आहेत त्यांच्याच सेवेत कायम रुजू करा. आणि या कार्यक्रमांच्या बसेस मध्ये मुलींव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश देऊ नका.
जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात चालणाऱ्या एकही बसेस शाळा-कॉलेज च्या वेळेवर चालत नाहीत, किंवा कधी-कधी तर बसच येत नाही.फक्त एक बस मानव विकास ची चालते मात्र त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश नाही.त्यामुळे त्यांना खाजगी वाहनाने यावा लागते. त्याचे ओझे ते सहन करू शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी बस ची व्यवस्था करून द्यावी.अर्थातच ग्रामीण व दुर्गम भागात शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी लोकल बसेस ची संख्या वढवावी.
जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये पाहिजे तेवढया बसेस उपलब्ध नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत सर्वसामान्यांना त्रास होतो. आपण लोकल बसेस कमी करून खाजगीकरणात चालणाऱ्या शिवशाही,हिरकणी बसेस ची संख्या सोबतच फेऱ्या सुद्धा वाढवल्या आहे. जेव्हा की ती गाडी सर्वसामान्यांना परवडणारी नाही.त्यामुळे लोककेंद्री निर्णय घेऊन पाहिजे तेवढ्या लोकल बसेस उपलब्ध करून द्यावे.
चालक व वाहक यांना थांबा वेळ (Running Time) वाढवून देण्यात यावे.
एस. टी. कर्मचाऱ्यांना फक्त ५०० रू.महिना घरभाडे मिळते,ते अतिशय कमी आहे.तरी त्यांच्या घरभाड्याच्या भत्त्यात किमान २,००० रू. वाढ करण्यात यावी.
बस स्थानक भंडारा ची अतिशय खराब अवस्था झालेली आहे, त्यामुळे नागरीकांसोबतच महामंडळ च्या कर्मचाऱ्यांनाही खूप त्रास होतो. तिथं मोठे व भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे म्हणून एस.टी. बसस्थानकाच्या संपूर्ण परिसराची तात्काळ युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी. तसेच बस स्थानकावरील व लागून असलेल्या खांबावरील बंद लाईट त्वरित लावण्यात यावे व परिसरातील येणारे पाणी बंद करण्यात यावे.
बस मधील आरक्षणाच्या जागे वर पाञ लाभार्थ्यांने जागेची मागणी केल्यास विशेषतः महिला,दिव्यांग,ज्येष्ठ,पञकार इत्यादींना वाहकाने सीट उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे.किंबहुना बस मध्ये तसी नोटीस लावावी.
इत्यादी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती पठाण, विभाग नियंत्रक श्रीमती तनुजा अहिरकर यांना देण्यात आले व चर्चा करण्यात आली. खाजगी शाळांच्या( सनफ्लॅग, फादर एंजल्स व माणिक नगर) बस सेवेवर कॉम्रेड वैभव यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्यावर महामंडळाकडून उडवा उडवी ची उत्तर देत चर्चा संपवण्यात आली व त्यातून कुठलेही मार्ग निघाला नाही “आम्ही तुम्हाला लेखी देऊ” असे विभाग नियंत्रक यांच्याकडून सांगण्यात आले. चर्चेतून प्रश्न सुटतांना दिसत नसल्याने येत्या तीन दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन(AISF) च्या नेतृत्वाखाली सर्व विध्यार्थ्यांना एकत्रित करून शासन-प्रशासनाविरुद्ध येत्या २८ सप्टेंबर ला बस सोबतच लोकप्रतिनिधींवर “अंडा फेको” आंदोलन करण्यात येईल. याला सर्व अधिकारी-लोकप्रतिनिधी व आपले प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे राज्यसचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांनी दिला आहे.यावेळी राज्यसचिव वैभव चोपकर यांच्या शिष्टमंडळात जिल्हा सचिव कॉम्रेड विश्वजित,जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड प्रणय, जिल्हा सहसचिव कॉम्रेड साहिली, कॉम्रेड लोकेशा, कॉम्रेड आकांशा, कॉम्रेड निशिका, कॉम्रेड तुषार, कॉम्रेड तृप्ती, अबोली, दामिनी इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.