तिरोडा विधानसभा क्षेत्रात होणार परिवर्तन गुड्डु बोपचे यांनी काढली जन आशीर्वाद यात्रा बदल हवा तर चेहरा नवा
गोंदिया जिल्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत बोपचे यांनी परिवर्तन जन आशीर्वाद यात्रा काढली असून या यात्रेला नारिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत गुड्डू बोपचे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कढून तिरोडा विधानसभेची उमेदवारी मिळाली असता गुड्डू बोपचे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत ५० हजार ५१९ मते मिळविली होती, मात्र काही मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर देखील मतदार संघ न सोडता सतत पाच वर्षे मतदार संघातील लोकांची कामे केली . तर नुकतेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत बोपचे यांना उमेदवारी मिळण्याची शकत्या वरिष्ठ नेते मंडळींनी वर्तविली असल्याने . गुड्डू बोपचे यांनी दोन वेळा सतत आमदार राहिलेले विद्यमान आमदार विजय रहगडाले यांच्या विरुद्ध पुन्हा तिरोडा विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवीत परिवर्तन करण्याचा संकल्प केला असून . गुड्डू बोपचे यांनी आपल्या मतदार संघात २५ दिवशीय जण आशीर्वाद यात्रा काढत मतदारण पर्यंत जाऊन आशीर्वाद घेण्याचा काम सुरु केले आहे तर काय म्हणाले गुड्डू बोपचे पाहूया
तर गुड्डू बोपचे यांनी २३ सप्टेंबर पासून तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या शेवटचा गाव समजल्या जाणाऱ्या सीतेपार गावातून जण आशीर्वाद यात्रेला सुरवात केली असून दर दिवशी १० च्या वर गावात जाऊन लोकांचा आशीर्वाद घेत आहेत तर रात्री त्याच गावातील एखाद्या कार्यकर्त्यांकडे राहून रात्रीचा मुकाम करतात तर दुसऱ्या दिवशी पुनः जन आशीर्वाद घ्यालाल निघत असून या निवडणुकीत तिरोडा विधानसभा क्षेत्रांत बदल हवा तर चेहरा नवा अशी भूमिका मतदारांनी देखील घेतली असल्याने त्यांच्या या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे