तुमसर – हॉकीचे जादूगार असलेले प्रख्यात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय तुमसर येथे शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. प्रसंगी प्राध्यापिका डॉक्टर कल्पना राऊत यांच्या हस्ते फोटोला माल्यार्पण करण्यात आले. प्राध्यापक उमेश चव्हाण यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत या दिवसाचे महत्त्व विषय केले व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थीनी तुमसर येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त महामॅरॉथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात महिला पंच म्हणून शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर अरुणा यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर अरुणा थुल यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्राध्यापकवर्ग प्राध्यापिका डॉक्टर निता सोमनाथे, प्राध्यापिका डॉक्टर मुबारक कुरेशी, प्राध्यापक मंगेश वागदे, प्राध्यापक विकास मेश्राम, प्राध्यापक अशोक चोपकर, प्राध्यापिका गायत्री शिरसाम, कुमूद पारधी, संजीवनी देशमुख, श्री विनोद तितीरमारे, देवेंद्र मंडपे, क्रुष्णा तितीरमारे आणि बहुसंख्या विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.