जिल्हा रेलयात्री समितीची आमसभा संपन्न नविन कार्यकारी मंडळाची निवड
भंडारा जि. रेलयात्री सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थाध्यक्ष श्री. प्रेमराज मोहोकार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली अर्पण करून आमसभेच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली. प्रारंभी संस्था सचिवांनी संस्थेचा वार्षिक जमा खर्च, अंकेक्षित अहवाल व मागील सभेचे इतिवृत्त सभेपुढे सादर केले. त्यास सर्वांनुमते मान्यता प्रदान करण्यात आली. सभेत पुढील पाच वर्षाकरीता संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळात श्री. प्रेमराज मोहोकार अध्यक्षपदी तर डॉ. बबन मेश्राम यांची सचिव पदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी श्री. रमेश सुपारे, सहसचिव श्री. हिवराज उके, कोषाध्यक्ष श्री. वरियलदास खानवानी यांची पदाधिकारी म्हणुन तर मार्गदर्शक म्हणुन सेवक कारेमारे, सर्वश्री सुरेश फुलसुंगे, विजय निखार, दिलीप मोहनकर, डॉ. जयंत गिरीपुंजे, डॉ. गोवर्धन भोंगाडे, ललितसिंह बाच्छील, हेमंत चंदावसकर, देवराम मेश्राम, मालती सुपारे यांची कार्यकारी मंडळ सदस्यपदी निवड करण्यात आली. तसेच सर्वश्री सदानंद इलमे, चंद्रकांत शहारे, नारायणसिंह राजपुत, मनोज ग्वानाली, शुभदा झंझाड यांना निमंत्रीत सदस्य म्हणुन स्विकृत करण्यात आले. आमसभेत रेल्वे प्रवाश्यांच्या अनेक मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यात सिनीअर सिटीझनला रेल्वे प्रवासात सुट देण्याची, रेल्वे स्टेशन सल्लागार समितीवर प्रतिनिधीत्व देण्याची, जनरल बोगींची संख्या वाढविण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर ३५ जलद गती गाडयांची थांबे नाही. यासंबंधी रेल्वेमंत्री तसेच रेल्वेचे वरीष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देवूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. जिल्हयाचे जनप्रतिनिधी, मंत्री आर्दिना भेटून मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला असला तरी जनप्रतिनिधींची याबाबतीत उदासीनता व दुर्लक्ष तसेच रेल्वे बोर्ड व रेल्वे अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा व नाकर्तेपणा यामुळे भंडारा रोड रेल्वे स्टेशन जिल्हयाचे ठिकाण असुनही रेल्वे थांब्याबाबतीत उपेक्षीत राहीले, याबाबद सभेत सदस्यांनी आपली खंत व्यक्त केली. काही जलदगती गाडयांचे यांबे मिळावेत म्हणून नविन कार्यकारी मंडळ नव्याने प्रयत्न करणार असुन जिल्हयातील खासदार प्रफुलभाई पटेल व खा. विवेक पडोळे यांच्याशी भेटून चर्चा करणार आहेत. सभेचे प्रास्ताविक श्री. रमेश सुपारे यांनी केले, बबन मेश्राम यांनी सभेचे संचालन केले तर हेमंत चंदावसकर यांनी सदस्यांचे आभार मानले.