आठवड्याभरातली दुसरी मोठी कारवाई… 1 लक्ष 82 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले
गोंदिया : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सह मुख्याधिकारी चा अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर 4 लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे 7 मे ला गोंदियाच्या गोरेगाव येथे तहसीलदार व नायब तहसीलदार व अन्य एक ईसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.