मजुर नेणारे वाहन उलटले; तब्बल 27 मजुर जखमी सोनेगाव स्मशानभूमी जवळील घटना*
भंडारा;- पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज मजुर नेणारे वाहन अनियंत्रित होवून शेतबांधित उलटले.त्यात वाहनातील 27 मजुर जखमी झाले तर त्यातील 14 मजुरांवर उपचार सुरू आहेत. आणि 2 गंभिर जखमी मजुरांना भंडार्याला हलविण्यात आले.जखमी मजुर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते.जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे.शेतकरी हार्वेस्टर व मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत.धान कापणीला मजुर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजुर नेऊन शेतीची कामे उरकून घेत आहेत. अड्याळ जवळील नेरला येथील २७ मजुर हे धान कापणीकरीता टाटाएस वाहन क्र.एम एच ३६ एफ १०६० या वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे नेत असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक मालक महेंद्र मुरकुटे रा.नेरला याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होवून शेतबांधित उलटले. त्यात वाहनातील २७ मजुर जखमी झाले.