डॉ.कांचन वानेरे, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर यांनी आरोग्य विषयक कार्यक्रमाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
भंडारा – मा.डॉ.कांचन वानेरे, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर यांनी दि.3/5/2024 रोजी लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय लाखांदूरअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक कार्यक्रमाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण रुग्णालय लाखांदूर, प्रा.आ.केंद्र बारव्हा येथे भेट देऊन पाहणी केली. आढावा आणि पाहणी दरम्यान डॉ.मिलिंद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.डि.के.सोयाम जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सचिन चव्हाण अति.जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ. महेंद्र धनविजय सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अमरदिप नंदेश्वर DTO, श्री मनिष नंदनवार मंडळ कार्यक्रम अधिकारी, डॉ. एस.डी. कैकाडे तालुका आरोग्य अधिकारी पवनी, डॉ.पडोळे तालुका आरोग्य अधिकारी लाखांदूर, जिल्हा स्तरीय कार्यक्रम अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा, गट प्रवर्तक उपस्थित होते.