राजनीति
भंडारा महिला काँग्रेसच्या वतीने लाखनी येथे सत्याग्रह मार्च
भंडारा- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून भंडारा जिल्हा महिला काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली लाखनी येथे “समानता और सद्भाव के कदम” सत्याग्रह मार्च काढण्यात आला असुन केंद्रातील मोदी सरकारने महिलांसाठी 33 % आरक्षण बिल लागू केले पण ते कधीपासून लागू होईल याची काही शाश्वती नाही, मणिपूरमध्ये १५० दिवस महिलांवर अत्याचार सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत होते? महिला खेळाडू अनेक महिने आंदोलन करत असतांना मोदी सरकारने दुर्लक्ष केले अशा सरकारच्या वाढत्या अत्याचाराविरोधात, महागाई विरोधात अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन महिला काँग्रेसच्या वतीने शांततेत सत्याग्रह मार्च काढण्यात आला